भुसावळातील भोळे महाविद्यालयात मेहंदी स्पर्धा उत्साहात


भुसावळ (11 मार्च 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच मेहंदी स्पर्धा झाली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील 18 तर कनिष्ठ महाविद्यालयातील 10 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ देण्यात आला. या दरम्यान स्पर्धकांनी मेहंदी काढली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी स्पर्धेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना भेटून त्यांना प्रोत्साहन दिले.

यांनी पटकावला क्रमांक
स्पर्धेचे परीक्षण केल्यानंतर उत्कृष्ट मेहंदी काढणार्‍या वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांपैकी लक्ष्मी मनोज राठोड यांना प्रथम, दिव्या संजय साळुंखे द्वितीय, प्रिया सतीश येवले हिला तृतीय क्रमांकाचे आणि कनिष्ठ महाविद्यालय गटातून दिशा निवृत्ती लोहार हिला प्रथम तर मोहिनी भोई हिला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.निर्मला वानखेडे यांनी काम पाहिले. स्पर्धा आयोजनासाठी सांस्कृतिक समिती चेअरमन प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.संजय देविदास चौधरी, प्रा.ऐश्वर्या वासकर यांनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.