गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार उपक्रमास मंजुरी
जलक्रांतीच्या भुसावळ तालुका प्रमुखपदी चेतन जैन यांची नियुक्ती

भुसावळ (11 मार्च 2025) : पाण्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करण्याच्या उद्देशाने गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार या उपक्रमास जळगाव जिल्ह्यात प्रत्येक गावात राबवण्याकरिता जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली आहे. नाला खोलीकरण व इतर विविध विषयांवर जिल्हाधिकारी सोबत भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकार्यांची सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या उपक्रमाचे अंमलबजावणी करताना तहसीलदार, बीडिओ, सरपंच यांनी बीजीएसच्या पदाधिकार्यांना सोबत घेऊन बैठक व चर्चा करावी अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकित जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जलसंधारण विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी, भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनय पारख, जलप्रकल्प जिल्हाप्रमुख सुमित मुणोत, जळगाव जलक्रांती प्रमुख पंकज जैन, रावेर तालुकाप्रमुख देवेंद्र शाह, उचल देरेकर, भुसावळ तालुकाप्रमुख चेतन जैन, धरणगाव तालुकाप्रमुख नीलेश ओस्तवाल, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय राखेचा, जलकार्य जिल्हा समन्वयक गणेश कोळी आदी उपस्थित होते.
शेतकरी कल्याण साठी जलसंधारणाच्या माध्यमातून कार्य करणे तसेच, जनजागृतीसाठी 22 मार्च 2025 हा दिवस जागतिक जलदिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे भुसावळ तालुकाप्रमुख चेतन जैन यांनी सांगितले
प्रत्येक गावा गावात घरा-घरात जनजागृती व प्रचार प्रसार करून प्रकल्प यशस्वी करण्याकरिता भारतीय जैन संघटनेचे सर्व पदाधिकारी पूर्णपणे तयार असल्याची हमी विनय पारख यांनी दिली.


