भुसावळ तालुक्यात आपले सेवा ई सेवा केंद्र चालकांद्वारे लूट : माहिती अधिकार कार्यकर्ता केदार सानप यांची तक्रार


भुसावळ (15 मार्च 2025) : नाशिक येथील राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुळकर्णी या नुकत्याच भुसावळ तालुका दौर्‍यावर आल्यानंत त्यांनी शहरासह तालुक्यातील शासकीय कार्यालये तसेच ई सेवा केंद्रांची पाहणी केली. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी त्यांची भेट घेत ई सेवा केंद्रावर नागरिकांच्या लुटीबाबत निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी केली.

दराचा फलक नाही : नागरिकांची लूट
केदार सानप यांच्या निवेदनानुसार. शहरासह तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना देण्यात येणार्‍या सेवांचे सुचना फलकाप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत मात्र काही ई सेवा केंद्रातून नागरिकांकडून जास्त पैसे घेवून काही ई सेवा केंद्र चालक नागरिकांची फसवणूक करीत आहेत. नागरिकांना त्रास तर सहन करावा लागतोच तसेच आर्थिक नुकसानही सोसावे लागते, अशा ई सेवा केंद्रांची चौकशी होवून ते त्वरीत बंद करण्यात यावे व याबाबत झालेल्या कारवाईची एक प्रत देण्याची मागणी आयुक्त चित्रा कुळकर्णी यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !