यावलला पोलीस खात्याकडून फलक व पोस्टर लावून लोक अदालतीसंदर्भात जनजागृती


यावल (16 मार्च 2025) :  यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे शनिवार, 22 मार्च रोजी
आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीच्या अनुषंगातून प्रलंबित असलेले दावे निकाली काढले जाणार आहेत. या लोक अदालतीसंदर्भात यावल पोलीस ठाण्याकडून विविध ठिकाणी फलक आणि पोस्टर लावून जनजागृती केली जात आहे.

यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अर्षद गवळी, राजेंद्र पवारसह आदींच्या वतीने विविध भागात, शहरात सार्वजनिक ठिकाणी पोस्टर आणि फलक लावले जात आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी 22 मार्च रोजी होणार्‍या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहनदेखील केले जात आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !