भुसावळात जागतिक ग्राहक दिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन
भुसावळ (16 मार्च 2025) : शहरातील तापी सभागृहात ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे प्रकाशीत झालेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुरवठा अधिकारी रोशना रेवतकर यांच्याहस्ते झाले.
अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ जळगावचे सर्व साधक संघटक युवराज कुरकुरे होते. मिलिंद मांडाळकर, निलेश देशमुख, सुयोग चौधरी यांची उपस्थिती होती. रोशना रेवतकर मॅडम यांनी ग्राहकांचे हक्क व जबाबदारी याबाबत माहिती दिली. निलेश देशमुख यांनी प्लास्टिकच्या वापरामुळे उद्भवणार्या समस्यांवर प्रकाश टाकत पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याचे आवाहन केले. युवराज कुरकुरे यांनी बदलत्या जीवनशैलीचे न्याय संक्रमण याबाबत मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे मिलिंद मांडाळकर, निलेश देशमुख, सुयोग चौधरी, पुरवठा अधिकारी रोशना रेवतकर, पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजेसह वितरण व्यवस्था संघटनेचे पदाधिकारी, पुरवठा विभाग अधिकारी व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक बाविस्कर यांनी केले.
