पिंप्रीसेकम येथे व्यसनाच्या प्रतिकात्मक होळीचे दहन


भुसावळ (16 मार्च 2025) : भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथे होळीच्या निमित्ताने व्यसनाच्या प्रतीकात्मक होळी दहनाचा आगळा-वेगळा कार्यक्रम झाला. प्रतिकात्मक होळीचे आयोजन संघर्ष समिती पिंप्रीसेकम आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या राज्य कार्यकारिणीचे सचिव चंद्रकांत चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे जळगाव जिल्हा संघटक प्रा.डॉ.दयाघन एस.राणे व थोरगव्हाण शाळेचे शिक्षक युवराज कुरकुरे उपस्थित होते. पिंप्रीसेकम गावाच्या मध्यवर्ती भागात ग्रामस्थांच्या सहकार्याने या होळीचे आयोजन करण्यात आले

प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी व्यसनांचे होणारे दुष्परिणाम स्पष्ट करीत अंमली पदार्थ सेवन ही शरीर, कुटुंब आणि समाज यांच्या स्वास्थ्यासाठी घातक असल्याचे सांगितले. चंद्रकांत चौधरी यांनी पिंप्रीसेकम येथील ग्रामस्थांमध्ये व्यसनाच्या जागृतीसोबतच रोजगार आणि प्रदूषणाच्या प्रश्नासाठी आंदोलन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. प्रबोधनाच्या या कार्यक्रमानंतर गावातील लहान मुलांच्या मदतीने नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांनी पुरवलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन ग्रामस्थांच्या माहिती आणि जाणीव जागृतीसाठी खुले करण्यात आले. संघर्ष समितीचे अध्यक्ष माकांत चौधरी यांनी उपस्थित तरुण आणि बालकांना व्यसन केल्यामुळे कर्करोगासारख्या भयानक आजार होत असल्याचे सांगितले.


यांची होती उपस्थिती
कार्यक्रम प्रसंगी पिंप्रीसेकम येथील संघर्ष समितीमधील राजेंद्रसिंह चहेल, सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आयोजन पिंप्रीसेकम येथील संघर्ष समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे राज्य कार्यकारिणी सचिव चंद्रकांत चौधरी, जळगाव जिल्हा संघटक डॉ.दयाघन एस राणे उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !