आडगाव-मनुदेवी रस्त्यावर दुचाकी अपघातात 18 वर्षीय तरुण ठार

यावल (17 मार्च 2025) : यावल तालुक्यातील आडगावपासून श्रीक्षेत्र मनुदेवी जाणार्या रस्त्यावर दुचाकी अपघातामध्ये 18 वर्षीय तरुण ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्री घडला. तातडीने या तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रविवारी यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
अपघाताचे कारण अस्पष्ट
आडगाव, ता.यावल गावातील रहिवासी शंकर निलेश बारेला (18) हा तरुण मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 19 डी. यु. 3305) घेऊन आडगाव येथून श्री क्षेत्र मनुदेवी येथे गेल्यानंतर परतचीया प्रवासात त्याचा अपघात झाला. या अपघातात तरुण जागीच ठार झाला. तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यााप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. हा अपघात कसा घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.


