अमळनेर पोलिसांची मोठी कामगिरी : बसमधील महिलांचे दागिणे लांबवणार्‍या यवतमाळच्या महिलांना अटक

अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ःसात लाख 80 हजारांचे दागिणे जप्त


Big achievement by Amalner police : Yavatmal women arrested for removing jewellery from women in bus अमळनेर (17 मार्च 2025) : बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तसेच पर्समधील महत्त्वाचा ऐवज लुटणार्‍या यवतमाळच्या दोन अट्टल महिलांना अमळनेर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. आरोपी महिलांच्या अटकेनंतर अनेक ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. गंगा चैना हातगळे (वय 40) आणि गंगा सुभाष नाडे (वय 47, दोघी रा. यवतमाळ) अशी अटकेतील महिला चोरट्यांची नावे आहेत.

चोरीरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
8 मार्च 2025 रोजी प्रतिभा जिजाबराव पाटील (48, रा.गारखेडे, ता. धरणगाव) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 6 मार्च रोजी त्या धरणगावहून दोंडाईचा बसने नातेवाईकांच्या लग्नाला जात होत्या. त्यांच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र चोरीला गेले होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन महिला अमळनेरच्या चोपडा नाका स्टॉपवर उतरल्या होत्या. त्यानंतरच चोरी झाल्याचे लक्षात आले.

सात लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
अमळनेर पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी महिला वरुड, जि.अमरावती येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंगा चैना हातगळे (वय 40) आणि गंगा सुभाष नाडे (47, दोघी रा. यवतमाळ) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले तीन लाख 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या आणि चार लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.

पथक मागावर येताच ठिकाणे बदलली
आरोपी महिलांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्यप्रदेशातील तिगाव, पांढुर्णा आणि इंदोर अशा अनेक ठिकाणी वास्तव्याची ठिकाणे बदलली मात्र पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवत वरुड येथील आठवडी बाजारात पकडले.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तसेच अमळनेर प्रभारी परीवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हवालदार मिलिंद सोनार, पोलीस नाईक विनोद संदानशीव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, उज्वलकुमार म्हस्के, अमोल पाटील, गणेश पाटील आणि महिला होमगार्ड नीलिमा पाटील यांनी केली. पथकाला नेत्रम कार्यालय जळगाव येथील पंकज खडसे, कुंदनसिंग बयस, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी तांत्रिक मदत केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !