धुळ्यानजीक परप्रांतीय विक्रेत्याला लूटले : 24 तासात आरोपी जाळ्यात

धुळे तालुका पोलिसांची कामगिरी : 15 हजारांचा मुद्देमाल जप्त


धुळे (18 मार्च 2025) : परप्रांतीय मिक्सर विक्रेता दुचाकीवरून साहित्य विक्रीसाठी निघाल्यानंतर त्यास ठार मारण्याची धमकी देत शिविगाळ करीत जबरीने लुटण्यात आले होते. ही घटना बल्हाणे-मोरशेवडी रस्त्यावरील बंद पडलेल्या कारखान्याजवळ रविवारी दुपारी दोन वाजता घडली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल होताच 24 तासात आरोपीला लुटलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. ज्ञानेश्वर ईश्वर भील (25, वाघ, मोरशेवडी, ता.जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लूट प्रकरण
अभिजान मुन्ना खान (19, जामा मशिदीजवळ, उचा मोहल्ला, अतरोली, जि.अलीगड, ह.मु.मौलवीगंज, धुळे) हे मिक्सर विक्री करून उदरनिर्वाह करतात. रविवारी दुपारी ते मिक्सर विक्रीसाठी दुचाकीवरून निघाल्यानंतर त्यांना बल्हाणे-मोरशेवडी रस्त्यावर अडवत दुचाकीवरून दोघांनी शिविगाळ करीत त्यांच्याकडील एक हजार 600 रुपये किंमतीचे मिक्सर व 13 हजार 600 रुपये किंमतीची रोकड लुटून पोबारा केला होता. धुळे तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होताच 24 तासात आरोपीला अटक करण्यात आली.




यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, खालेदा सैय्यद, हवालदार कुणाल पानपाटील, हवालदार उमेश पवार, हवालदार अविनाश गहिवड, कॉन्स्टेबल विशाल पाटील आदींच्या पथकाने केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !