भुसावळात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

प्रेरणादायी इतिहासाला उजाळा : मिरवणुकांनी वेधले लक्ष


भुसावळ (18 मार्च 2025) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती रविवार, 17 रोजी भुसावळ शहर व विभागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रेरणादायी इतिहासाला उजाळा देण्यात आला तर ठिकठिकाणी ढोल-ताशांसह डिजेच्या दणदणाटात मिरवणुका काढण्यात आल्या.

भुसावळात अवतरली शिवशाही
भुसावळात रविवारी मध्यरात्री 12 वाजता शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. न्मोत्सवाचा पाळणा, दुग्धाभिषेक, प्रयागराज कुंभ तिर्थाचा जलाभिषेक व आतषबाजीने भुसावळकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शिवकालीन किल्ल्याच्या भव्य आरासमुळे शहरात शिवशाहीच अवतरल्याचा शहरवासीयांना अनुभवास आले. शिवजन्मोत्सव समितीतर्फे सेामवारी सकाळी नाहाटा महाविद्यालय ते रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली तर दुपारी अन्नदान, वेशभुषा, चित्रकला, निबंध स्पर्धा झाली. सायंकाळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना शिवभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शहरातील विविध भागांतून सायंकाळी नऊ मिरवणुका निघाल्या. मिरवणुकींमध्ये चित्तथरारक कसरती लक्षवेधी ठरल्या.


नेत्रदीपक रोशनाईने वेधले लक्ष
भुसावळातील छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीने यंदा रेल्वे स्थानकाजवळील श्री शिवरायांच्या पुतळ्याजवळ भव्य लाईट शोचे आयोजन केले शिवाय पुतळ्याजवळ भव्य आरास साकारण्यात आली. महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व शिवरायांनी दिलेल्या शिकवणींची माहितीचे फलक लावण्यात आले. सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष निर्मल कोठारी, उपाध्यक्ष नितीन धांडे व सर्व पदाधिकार्‍यांनी यंदा उत्कृष्ठ नियोजन केले.

दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीतर्फे सोमवारी सकाळी पु.ओ.नाहाटा महाविद्यालय, जामनेरररोड, मामाजी टॉकीज, सतारे चौक, जळगावरोड, टेक्नीकल हायस्कूल, गांधी पुतळा, शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे, मुख्य बाजार भाग आदी मार्गाने सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !