भुसावळात अमृत योजनेचे काम न करणार्‍या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : केदार सानप


भुसावळ (19 मार्च 2025) : शहरातील अमृत योजनेच्या टप्पा दोनमधील कामाला पाच महिन्यानंतरही सुरूवात झाली नसल्याने ठेकेदाराकडून काम काढून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सामजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी भुसावळ नगरपालिका प्रशासक जितेंद्र पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अमृत योजना टप्पा दोनला 15 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदार (मक्तेदार) यांना देण्यात आला मात्र पाच महिने होवूनही अद्यापपर्यंत कुठलेही काम सुरू झालेले नाही. याबाबत संंबंधित ठेकेदाराची चौकशी होवूनही ठेकेदाराकडून अमृत योजना टप्पा दोनचे काम काढून घेण्यात येवून या ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्यात यावे, अशी मागणी भुसावळ नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना निवेदनाद्वारे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !