भोंग्याबाबतचे नियम पाळावे : पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल


रावेर (19 मार्च 2025) :  भोंग्या बाबत मंदिराचे ट्रस्टी व मशीदीच्या मौलांनांनी राज्य शासनाने केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन रावेरचे पोलीस निरिक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी शहरात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले. आगामी रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी यासह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन
पोलीस निरीक्षक जयस्वाल म्हणाले की, भोंग्याबाबत काटेकोरपणे पालन करावे. विनापरवानगी भोंगे वाजवू नये तसेच आगामी सण उत्सव शांततेत साजरे करून प्रशासनात सहकार्य करावे. यावेळी पोलीस ठाणे अंतर्गत शहर व परिसरातील मंदिरांचे ट्रस्टी तसेच मशिदींच्या मौलवींसह व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, सी.एस.पाटील, दिलीप कांबळे, सोपान साहेबराव पाटील, नितीन पाटील, गयास शेख, गयासउद्दीन काजी, शैलेंद्र अग्रवाल, युसूफ खान मेहमूद शेख, सादीक शेख, अब्दुल मुत्तलीब, संजय बुवा तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !