यावल आदिवासी वसतीगृहात आमदारांची भेट : विद्यार्थ्यांच्या जाणल्या समस्या


यावल (19 मार्च 2025) : यावल आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहात रविवारी सायंकाळी अचानक आमदारांनी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या अडी, अडचणी, समस्या जाणून घेतल्या तसेच येथील समस्या सोडवत विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यात याव्या, अशा सुचना प्रकल्प कार्यालयास त्यांनी केल्या.

विद्यार्थ्यांनी वाचला असुविधांचा पाढा
रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी रविवारी अचानक यावल शहरातील एकात्मिक आदिवासी शासकीय मुला-मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच वस्तीगृहाच्या स्थितीची सविस्तर माहिती घेतली. आमदार जावळे यांनी वस्तीगृहात मुलांना मिळणार्‍या सुविधा, अडचणी आणि गैरसोय याची पाहणी केली. विशेषता मुलांच्या वस्तीगृहात असलेल्या तांत्रिक व्यवस्थापकीय त्रृटींवर त्यांनी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याशी चर्चा करत वस्तीगृहाच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करण्यात संबंधित अधिकार्‍यांना तत्काळ नोटीस पाठवण्याच्या सूचना दिल्या.


यांची होती उपस्थिती
प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सविता भालेराव, भाजपा उपाध्यक्ष मुकेश कोळी, शेतकी संघाचे अतुल भालेराव, युवा मोर्चाचे व्यंकटेश बारी, भूषण फेगडे, पराग सराफ, बबलु घारू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दर्जेदार सुविधा द्या
आमदार अमोल जावळे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आश्वासन दिले. त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, वस्तीगृहातील विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींना बळी पडू नये आणि त्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !