लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार ? अजित पवारांनी मांडली ही भूमिका
When will my beloved sisters get Rs 2100? Ajit Pawar presented this position मुंबई (20 मार्च 2025) : राज्यभरातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने दिले असलेतरी अर्थसंकल्पातही महिलांच्या पदरी काही पडले नाही मात्र आता अधिवेशनात पुन्हा प्रश्न समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सध्या आमची परिस्थिती नाही, पण आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे ते म्हणाले आहे त्यामुळे तूर्त तरी लाडक्या बहिणींना दिड हजारांवरच समाधान मानावे लागणार आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार ? हा प्रश्न विरोधक सातत्याने उपस्थित करीत होते. यावर अजित पवारांनी निवेदन केले. ते म्हणाले की, आर्थिक परिस्थिती सुधारली की, बहिणींना 2100 रुपये देऊ. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही, असे म्हटलेलो नाही. सगळी सोंग करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाही, त्या पद्धतीने आमचे काम चाललेले आहे. आम्ही त्या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे सांगितले आहे. मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. सध्या आम्ही 1500 रुपये कबुल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढची रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ती देऊ.

