राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू ; मंत्री दादा भुसे यांची माहिती


न्युज नेटवर्क । मुंबई (21 मार्च 2025) : आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात दिली. आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता आहे.


राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून एक एप्रिल पासून नवीन सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या विषयीच्या चर्चेला उत्तर मिळाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !