16 वर्षांनंतर पुत्ररत्नासह कन्या प्राप्ती आनंद ठरला औट घटकेचा ; पाचोर्‍यातील विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू


पाचोरा (21 मार्च 2025) : पाचोरा शहरातील विवाहितेला तब्बल 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कन्या व पूत्र रत्नाची प्राप्ती झाली मात्र जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मातेचा अवघ्या काही तासांत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात घडली. ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (37) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर ज्योतीच्या माहेरसह सासरचा परिवार दुःखसागरात बुडाला आहे.

पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (37) यांना लग्नाच्या 16 वर्षांनंतर दिवस राहिले व त्यांनी बुधवार, 19 मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावरील सावनेरकर हॉस्पिटलमध्ये जुन्या मुला-मुलीला जन्म दिला मात्र त्यानंतर तीन तासात बाळाला जन्म देणारी आई ज्योती चौधरी यांचे सायंकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.



या घटनेने महिलेचा पती, आई, वडील, भाऊ यांनी आक्रोश केला. विवाह होऊन 16 वर्षे झाली, तरी बाळ जन्माला येत नव्हते म्हणून ज्योतीच्या पतीने व आई-वडिलांनी उपचार केले व गेल्या नऊ महिन्यांपासून ज्योतीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.

या दुर्देर्वी घटनेमुळे ज्योतीचा माहेर व सासरचा परिवार दुःखसागरात बुडाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार सकाळी दहाला ज्योती चौधरीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !