यावलला गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरूवात

यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


यावल (22 मार्च 2025): यावल शहरातील विरार नगर भागातील गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवण्याच्या कामाला मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम होण्यासाठी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती पत्र देऊन निधीची मागणी केली होती. यापूर्वी पाटील नगराध्यक्ष असताना मंदिर परिसरात सभामंडप बांधला होता व परिसरामध्ये बगीचा निर्मिती केली होती.

भाविकांची झाली सोय
गजानन महाराज भक्त परिवार व परिसरातील रहिवासी यांनी मंदिरासमोरील चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी अतुल पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने पाटील यांनी निधी जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर करून आणला. निविदा प्रक्रिया होऊन कामाची सुरुवात करण्यात आली. हे काम नगर्रोत्थान योजनेतून मंजूर आहे. कामाची सुरुवात येथील प्रसिद्ध उद्योजक भैय्यासाहेब चौधरी, निवृत्त प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन, निवृत्त नायब तहसीलदार पी.एम.जोशी, प्रा.अशोक काटकर, प्रा.संजय कदम, मनिष चौधरी, शरद चतुर, महेश सराफ, विजय चौधरी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून कऱण्यात आली.


यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, अनिल पाठक, अशोक भंडारी, वासुदेव आमोदकर, प्रमोद बापू, नीलेश पाटील उपस्थित होते. पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी अतुल पाटील यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !