भुसावळातील प्राथमिक शिक्षक नूतन पतपेढीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर


भुसावळ (22 मार्च 2025) : शहरातील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळची निवडणूक जाहीर झाली आहे. 15 सभासदांनी आपले निवडणुकीसाठी फॉर्म भरले आहेत. यावल रोडवरील यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, जळगाव अशा सात तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेले प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

21 मार्चपर्यंत फॉर्म भरणे, 8 एप्रिल रोजी माघारी घेणे, 20 एप्रिल रोजी मतदान व 21 एप्रिल रोजी मतमोजणी असा कार्यक्रम आहे. दहा जागा या सर्वसाधारण, एक जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी एक इतर मागासवर्ग, एक विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व दोन महिला राखीव आहेत. 15 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भुसावळ उपनिबंधक डी.व्ही.पाटील आहेत.


तीन वर्षानंतर निवडणूक
सात तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेची संचालक मंडळाची मुदत 2021 मध्ये संपली होती परंतु कोरोना व इतर कारणांमुळे सदरची निवडणूक तीन वर्ष पुढे लोटली गेली. या पतपेढीमध्ये एकूण सभासद दोन हजार 251 आहेत तर यापैकी दोन हजार 165 मतदार आपल्या मतदाराचा हक्क 20 एप्रिलला बजावणार आहे. या पतपेढीमध्ये दहा कोटी 57 लाख 29 हजार 300 रुपये खेळते भाग भांडवल असून 15 संचालकांसाठी ही निवडणूक लढवली जात आहे. गुरुवारी पतपेढीचे विद्यमान संचालक प्रदीप सोनवणे, महिला राखी साठी मीरा जगले, विक्रांत पाटील, समाधान जाधव, विजयकुमार देवरे यांच्यासह 55 पेक्षा जास्त उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले आहेत. आठ एप्रिल रोजी माघारी होणार असून यानंतर खर्‍या अर्थाने पतपेढीचे चित्र समोर उभे राहील. या ठिकाणी पॅनल होईल किंवा नाही याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !