स्नेहयात्री राज्यस्तरीय करंडकात पहिल्या दिवशी आठ नाट्यप्रयोगांची मेजवानी

सामाजिक प्रश्नांना केला मर्मस्पर्श : आज सात एकांकिका होतील सादर


भुसावळ (23 मार्च 2025) : सांस्कृतिक चळवळीतील सर्वात भव्य अशा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘स्नेहयात्री करंडकाचा’ उद्घाटन समारंभ शनिवार, 22 मार्च रोजी पार पडला. एकांकिका स्पर्धेत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगावसह राज्यभरातील तब्बल 15 नाट्य संघ सहभागी झालेले आहेत. पहिल्याच दिवशी आठ नाट्यप्रयोगांनी भुसावळकर प्रेक्षकांना नाट्य मेजवानी दिली. रविवारी सकाळी सकाळी दहा वाजेपासून तीन सत्रात सात एकांकिका सादर होतील.

कृष्णचंद्र सभागृहातील कलागृहात स्व.लालचंदजी लखिचंदजी निमाणी सभागृह असे तर रांगमंचाला स्व.डॉ.उमेश खानापूरकर स्मृतीमंच असे नाव देण्यात आले आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा स्नेहयात्री करंडक स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख नारायण माळी, अध्यक्ष वीरेंद्र पाटील, परीक्षक मनोज डाळींबकर आदींच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनानंतर इंदाई फाऊंडेशन, जळगावच्या ‘कै.’ ह्या एकांकिकेत घरातील मृत्युपंथाला लागलेल्या वयोवृद्ध माणसांचे प्रश्न, नातेसंबंधामधला फोलपणा व पैशांभोवती गुंतलेले स्वार्थी आप्तस्वकीय ह्या वर मिश्किलपणे भाष्य केले गेले. विजिकिषा संस्था, नाशिकच्या ‘फुगडी’ ह्या एकांकिकेत जीवनातील प्रेमस्पर्षा अभावी एकटेपणाने व्याकूळ दोन बहिणींची जिवनोत्सूकता, मानवी स्पर्शाचा मनाशी असलेला संबंध आणि सौंदर्य व सुखातील परस्पर संबंधावर भाष्य करण्यात आले.


नाट्य आविष्कार वाखाणण्याजोगे
शोमन क्रिएशन्स, नाशिकचे ‘नेकेड अँड अफ्रेड’या एकांकिकेत वैचारिक टिप्पणी करण्यात आली. मुक्ताई फौंडेशन, पुणे ‘पाणीपुरी’ ह्या एकांकिकेत एका स्थापत्य अभियंत्यांचे भंगलेले स्वप्न आणि समाज व लोकहितासाठी त्याने दिलेले समर्पण मांडण्यात आले. या बरोबरीनेच कान्हदेश कला मंच, चोपडा संस्थेचे ‘रंगबावरी’ नुतन मराठा महाविद्यालय, जळगावचे ‘खेळ’ भाग्यदीप थिएटर, जळगावचे ‘चिमी’, विगीता एंटरटेनमेंट संस्था, नाशिकचे ‘पूर्णविराम’ हे नाट्य आविष्कार वाखाणण्याजोगे होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !