वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची नूतन कार्यकारणी जाहीर
वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा
भुसावळ (23 मार्च 2025) : ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश पाटील तर उपाध्यक्षपदी भानुदास पाटील, सचिवपदी सतीश जंगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
रिंग रोडजवळील योग केंद्रात वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष धनराज पाटील, सचिव प्रभाकर झांबरे, उपाध्यक्ष विश्वनाथ वाणी उपस्थित होते. सुरवातीला दिवंगत सभासदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी 2016 ते आजतागायत संघाची वाटचाल, विविध उपक्रम, आरोग्य मेळावे,चर्चा सत्र,सहल, स्नेहसंमेलन,स्नेह भोजन,सत्कार समारंभ आदी राबविले उपक्रमाबद्दल सिंहावलोकन झाले. माजी पदाधिकार्यांनी आपला पदभार सोडतांना आपल्या सोनेरी आठवणी मांडल्या. यावेळी सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच आगामी संघाची वाटचाल यावर विचारमंथन झाले. सूत्रसंचालन प्रभाकर झांबरे तर आभार विश्वनाथ वाणी यांनी मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

नूतन कार्यकारिणी अशी
अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, सहसचिव संजय चौधरी, उपाध्यक्ष भानुदास पाटील, कोषाध्यक्ष जीवराम शिवतुरे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश सरोदे, मनोज नेमाडे, मोतीराम चौधरी, अशोक ढाके, यशवंत वारके, संजीव चौधरी, खुशाल महाजन, वैशाली पाटील, इंदूबाई सपकाळे, लता जंगले, गोटू फिरके, पंडित पाटील ,रवींद्र नारखेडे, सोपान नेमाडे, अनिल पाटील यांची निवड करण्यात आली.
