भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये गुणवंतांना पुरस्काराचे वितरण


भुसावळ (23 मार्च 2025) : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शुक्रवार, 21 मार्च रोजी वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ झाला. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी तर प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी व बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी व विशेष अतिथी म्हणून राजू पारीख व प्रवीण भराडीया उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस वितरण करण्या तआले.

यांची होती उपस्थिती
डॉ.रमेश जोशी यांनी शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनाचे अविभाज्य अंग असून बियाणी मिलिटरी स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्पर्धेत जिंकणार्‍यासोबत पराजित होणारा प्रतिस्पर्धी हादेखील महत्त्वाचा असतो, असेही ते म्हणाले. बियाणी एज्युकेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !