सोशल मिडीयाचा आक्षेपार्ह वापर केल्यास कठोर कारवाई : सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे


Assistant Police Inspector Rameshwar Motale फैजपूर (23 मार्च 2025) : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा संवादाचे प्रभावी माध्यम असलेतरी त्याचा त्याचा उपयोग समाज घडवण्यासाठी व्हावा, विघटनासाठी नव्हे, असे मत फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी व्यक्त केले. अनेकवेळा खोट्या अफवा, खोट्या बातम्या किंवा द्वेषपूर्ण पोस्ट्स टाकून दोन जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र असे प्रकार घडल्यास निश्चितपणे दोषींवर कठोर कारवाई होईल त्यामुळे प्रत्येकाने सोशल मिडीयाचा जपून वापर करावा, असे आवाही त्यांनी केले.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक
शहरातील शुभदिव्य मंगल कार्यालयात आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांतता समितीची बैठक् झाली. सर्व गावचे पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


सामाजिक ऐक्य वाढवा
सहाय्यक निरीक्षक मोताळे म्हणाले की, सोशल मिडीयावर कुठलीही पोस्ट टाकताना आधी ती पोस्ट सत्य आहे वा नाही याची पडताळणी करणे गरजेचे आहे. द्वेष पसरवणार्‍या पोस्ट्स टाळाव्यात अथवा अशा पोस्ट्सवर प्रतिक्रिया देऊ नये वा त्याचा प्रसार (फॉरवर्ड) करू नपये, सामाजिक ऐक्य वाढवणार्‍या आणि सकारात्मक संदेशांचा प्रसार करावा, असेही मोताळे म्हणाले. आपण जर जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर केला, तर समाजात सलोखा आणि शांतता टिकवू शकतो. जबाबदारी ओळखून समाज जोडणारे हात बनूया, असेही मोताळे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !