एक खोक्याभाईचे काय घेवून बसलात विधानसभेत सगळे खोके भाईच भरलेत : राज ठाकरेंचा महायुतीला टोला
न्युज नेटवर्क । मुंबई (23 मार्च 2025) : एक खोक्या भाई घेऊन काय बसला आहेत, अख्ख्या विधानसभेत खोके भाई भरले आहेत, असा टोला रवींद्र नाट्य मंदिरात महत्वाची बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारला लगावला.
ठाकरे म्हणाले की, मूळ विषय राहिलेत बाजूला , बाकीच्या विषयात भरकटून टाकलं जातंय, असंही राज ठाकरे म्हणाले. मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत. त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असंही राज ठाकरे म्हणाले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईत पदाधिकार्यांचा मेळावा घेतला. मनसेच्या पक्षसंघटनेत बदल करण्यात आले , मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली तर दक्षिण मुंबईच्या उपशहर उपाध्यक्षपदी यशवंत किल्लेदार यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर देण्यात आली आहे. तसंच मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर गट अध्यक्षांच्या कामाचा तर राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर मनसेच्या शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.
राज ठाकरे यांच्या या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार यांनीही खोचक उत्तर दिले आहे. ज्यांना निवडून येता येत नाही, लोक निवडून देत नाहीत. ते विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, अशी टीका आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
