शिवरायांविषयी अपमानजक विधान करणार्‍या प्रशांत कोरटकरला अखेर बेड्या


Prashant Koratkar मुंबई (25 मार्च 2025) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणार्‍या फरार प्रशांत कोरटकरला महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून काल दुपारी पावणेतीन वाजता अटक केली आहे. आरोपीला कोरटकरला आज कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडीत यांनी दिली.

काय आहे नेमके प्रकरण
प्रशांत कोरटकरवर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिस गत 25 फेब्रुवारीपासून त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सोमवारी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतले. तेलंगणात त्याच्या अटकेची योग्य ते सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याला कोल्हापुरात आणले जाईल. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्याला तिथे आणले जाईल.


प्रशांत कोरटकरचा नागपूर, इंदूर, मुंबई, चंद्रपूर येथे शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके गठीत केली होती. आरोपीचा अटकपूर्व जामीन देखील कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला होता. आज देखील आरोपीच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होती. दुपारी साडेचार वाजता ही सुनावणी होणार होती. परंतु, त्याआधीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने रद्द केलेला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !