स्नेहयात्री राज्यस्तरीय करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याची ‘इथे चुल कोणी मोडू नये’ एकांकिका प्रथम

‘रंगबावरी’ द्वितीय, तर तृतीय पारितोषिक ‘द अनसिन व्हीजन’ ला


भुसावळ (25 मार्च 2025) : शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे श्रीकृष्णचंद्र सभागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. शनिवार व रविवार असे दोन दिवस झालेल्या या स्पर्धेचा निकाल रात्री उशीरा जाहीर झाला. त्यात नाट्य परिवार या संस्थेची ‘इथे चुल कोणी मोडू नये’ ही एकांकिका प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर व्दितीय क्रमांक कान्हदेश नाट्य कला क्रीडा मंच, चोपड्याच्या ‘रंगबावरी’ या एकांकिकेने तर तृतीय पारितोषिक स्वामी नाट्यांगण, डोंबीवलीच्या ‘द अनसिन व्हीजन’ या एकांकिकेने पटकावले.

यांची होती उपस्थिती
स्व.लालचंद लखीचंद निमाणी सभागृह आणि स्व.डॉ.उमेश खानापूरकर स्मृतीमंचावर झालेल्या बक्षीस वितरण समांरभात उपस्थित मंत्री संजय सावकारे, उमेश नेमाडे, युवराज लोणारी, प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, मनोहर जाधवानी, डॉ.समीर खानापूरकर, सुषमा खानापूरकर, डॉ.नितीन दावलभक्त, विश्वनाथ निळे, प्रसाद मांडळकर, पुष्पा बोरसे यांच्याहस्ते बक्षीस वितरण सोहळा झाला.


संगीत संध्या कार्यक्रमात थिरकले मंत्री
समारोपप्रसंगी स्थानिक गायक कलावंतांची एकापेक्षा एक दर्जेदार गाणी सादर झालीत. कार्यक्रमाला उपस्थित मंत्री संजय सावकारे यांनी सुध्दा दोन गाणी सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. डॉ.नितीन दावलभक्त, संदीप जोशी, प्रवीण गांधेले, कुणाल बाविस्कर, हर्ष बाविस्कर यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गाणी सादर करत अक्षरक्ष: सभागृह डोक्यावर घेतले.

असा आहे स्पर्धेचा निकाल
ह.भ.प. कालिदास विठोबा नेमाडे स्मृती सांघिक प्रथम क्रमांक- इथे चूल कोणी मोडू नये (नाट्यपरिवार, ठाणे), स्व. अरुण मांडळकर सर स्मृती सांघिक व्दितीय क्रमांक- रंगबावरी (कान्हदेश नाट्यकला मंच, चोपडा), स्व.ईश्वर बोरसे स्मृती सांघिक तृतीय क्रमांक- द अनसीन व्हीजन (स्वामी नाट्यांगण, डोंबिवली), दिग्दर्शनासाठी स्व.अशोक कुलकणी स्मृती पुरस्कार प्रथम क्रमांक- प्रथम- अदिती जमदरे, साक्षी मणचेकर (इथे चूल कोणी मोडू नये), व्दितीय क्रमांक- मकरंद चौधरी (रंग बावरी), तृतीय- प्रथमेश देवकुळे/शुभम जाधव (द अनसिन व्हीजन), पुरुष अभिनयासाठीचा स्व.डॉ.उषा दावलभक्त स्मृती पुरस्कार- प्रथम – राघवच्या भूमिकेतील प्रथमेश देवकुळे ( द अनसिन व्हीजन), व्दितीय- डोलकरच्या भूमिकेतील प्रणव सपकाळे (पाणीपुरी), तृतीय- सुबन्याच्या भूमिकेत हनुमान सुरवसे (खेळ) यांनी पटकावला तर सचिन सावंत, रोहित ठाकरे, प्रथमेश चुबे यांनी पुरुष अभिनयाची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. स्त्री अभिनयासाठी मुक्ता दिनक लेकुरवाळे सन्मानार्थ पुरस्कार- प्रथम क्रमांक- अदिती जमदरे, साक्षी मणचेकर आणि गौरसी मोरे (इथे चुल कोणी मोडू नये), व्दितीय- सानिकाच्या भूमिकेत मोहिनी जोशी (द अनसिन व्हीजन), तृतीय- चिमीच्या भूमिकेत रचना अहिरराव (रंगबावरी), उत्तेजनार्थ- मंजुषा ठाकरे, अंकिता मुसळे, वृषाली पाटील नेपथ्यासाठी स्व.सुमन पाटील स्मृती पुरस्कार- प्रथम- पियुष पाटील (चिमी),
व्दितीय- सचिन गोताड (चारु), तृतीय- तुषार सोनवणे, तुषार वानखेडे
(तृतीय क्रमांक), प्रकाशयोजनेचे स्व. शांता प्रल्हाद जावळे स्मृती पुरस्कार – प्रथम- सिध्देश नांदलस्कर (इथे चूल कोणी मोडू नये), व्दितीय क्रमांक – निलेश माळी (रंगबावरी), चेतन पडवळ (चारु). मनोज डाळीम्बर, पुणे व शैलेश देशमुख (नगर) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. संगीत संध्येचे सूत्रसंचलन चैत्राली विसपुते तर बक्षीस वितरण समारंभाची सुत्रे प्रा.गिरीश कुलकर्णी यांनी सांभाळलीत.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख नारायण माळी, धनराज कुंवर, राजेश पाटील, हरीश कोळी, रमाकांत भालेराव, राजेंद्र जावळे, नितीश पाटील, सुनील तायडे, नवरत्न डहाके, सनी बाविस्कर, हर्ष बाविस्कर, संजीवनी यावलकर, खुशाल नींबाळे, दिनेश ठाकरे, हरीश कोळी, संजय यावलकर, भुषण तायडे, आदित्य पाटील, अमोल तायडे आदींनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !