प्रवाशांनो लक्ष द्या : म्हसावद यार्ड पुनर्रचना कामामुळे 26 मार्चपर्यंत ब्लॉक : भुसावळ देवळाली, बडनेरा नाशिक मेमू रद्द

Cancelled memo भुसावळ (25 मार्च 2025) भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे यार्ड पुनर्रचना कार्य हाती घेण्यात येत आहे. यासाठी अप लूप लाईन विस्तारीकरण व गतीवाढीकरणासाठी अप लूप लाईन 714 मीटरवरून 756 मीटरपर्यंत वाढविण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य तसेच ब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्याचा काही गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना याची नोंद घेण्याची विनंती केली आहे. हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी व सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी होणार्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे.
रेल्वेचा निष्काळजीपणा
रेल्वेचा ब्लॉक 23 ते 26 मार्च यादरम्यान आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून 23 तारखेला संध्याकाळी पाच वाजता प्रेस नोट जारी करण्यात आली. 23 तारखेला रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.