कुणाल कामरा स्पष्टच म्हणाला ; मी चुकीचे बोललो नाही , माफी मागणार नाही !


मुंबई (25 मार्च 2025) : मी काहीही चुकीचे बोललो नाही. अजित पवार (पहिले मुख्यमंत्री) यापूर्वी जे म्हणाले होते तेच मी म्हणालो, असे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा म्हणाला आहे.

मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावून मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले होते पण तो आला नाही. परिणामी, पोलिसांनी मुंबई स्थित त्याच्या घरी जावून त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण तो तिथे सापडला नाही. या घरी कुणाल कामराचे आई-वडील राहतात.


कुणाल कामराने आपल्या कवितेवरून तोडफोड झाल्यानंतर जवळपास 24 तासांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते आपल्या 4 पानी निवेदनात म्हणाले, मी माफी मागणार नाही. अजित पवार (प्रथम उपमुख्यमंत्री) हे एकनाथ शिंदे (द्वितीय उपमुख्यमंत्री) यांच्याविषयी जे म्हणाले होते, तेच मी म्हणालो. मी या जमावाला घाबरत नाही आणि मी पलंगाखाली लपून बसून प्रकरण शांत होण्याची वाटही पाहणार नाही.

ते म्हणाले, मनोजरंजनाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला (शूटिंगचे स्थळ) ते फक्त एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांची ती जागा आहे. हॅबिटेट (किंवा इतर कोणतेही ठिकाण) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. मी काय बोलतो किंवा करतो याचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. त्यांचे माझ्यावर नियंत्रणही नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचा यात संबंधही नाही. विनोदी कलाकारांच्या शब्दांसाठी अशा सेटवर हल्ला करणे म्हणजे चिकन दिले नाही म्हणून तुम्ही टोमॅटोचा ट्रक पलटी केल्यासारखी निरर्थक गोष्ट आहे.

माझ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी पोलिस आणि न्यायालयाला सहकार्य करण्यास तयार आहे. पण ज्यांनी विनोदाने नाराज होऊन तोडफोड केल्याच्या घटनेला एक वाजवी प्रतिक्रिया मानले, अशा लोकांना न्याय्य आणि समान कायदा लागू होईल का? आज कोणतीही पूर्वसूचना न देता हॅबिटेटवर पोहोचलेल्या आणि हातोड्याने ते ठिकाण उद्ध्वस्त करणार्‍या निवडून न आलेल्या महापालिका सदस्यांनाही लागू होईल का?

कुणाल कामराने आपल्या निवेदनाच्या शेवटी माध्यमांना या प्रकरणाचे प्रामाणिकपणे वार्तांकन करण्याचे आवाहन केला. या तमाशाचे प्रामाणिकपणे वार्तांकन करा. लक्षात ठेवा की भारत माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत 159 व्या क्रमांकावर आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !