रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी अभिजीत कदम
रावेर (26 मार्च 2025) : रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून अभिजीत कदम यांनी पदभार स्वीकारला आहे. रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांची खुलताबाद येथे बदली झाल्याने या जागेवर मोखाडा (पालघर) येथील नगर पंचायत मुख्याधिकारी अभिजीत कदम यांची पदोन्नतीवर रावेर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रावेर शहरातील नवीन हद्द वाढ झालेल्या वसाहतींचा प्रश्न सोडवणे तसेच नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत लक्ष देण्यात येईल.

