इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापन परीक्षा तातडीने घ्याव्यात

भुसावळात ठाकरे गट आक्रमक : उन्हात अप्रिय घटना घडल्यास शिक्षण विभागच जवाबदार


भुसावळ (26 मार्च 2025) : यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या 25 एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहेत मात्र एप्रिल महिन्यामध्ये तीव्र ऊन असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊन एखाद्याचा उष्माघाताने अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घ्याव्यात, अशी मागणी भुसावळातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्याकडे केली.

तर शिक्षण विभाग आरोपीच्या पिंजर्‍यात
निवेदनाचा आशय असा की, दरवर्षी परीक्षा मार्चमध्ये सुरू होऊन 10 एप्रिलपर्यंत पते परंतु यावर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा 28 एप्रिलपर्यंत होत आहे त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या जीवाची परवा केलेली दिसून येत नाही. उन्हामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी जवाबदार शिक्षण विभाग राहील, असा इशारा देत दरवर्षीप्रमाणे 10 एप्रिलपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात नियोजन करावे अन्यथा या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहोचल्यास शिक्षणाधिकारी यांच्या सोबत प्रक्रियेमध्ये जे कुणी अधिकारी आहे असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशारा देण्यात आला आहे.


निवेदन देताना शहरप्रमुख दीपक धांडे, निलेश महाजन, नरेंद्र लोखंडे, रहिम गवळी, पल्लवी वाटपाडे, पिंटू भोई, जितू पाटील, योगेश बागुल आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !