केएनसीटीआय एमटीएस परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

चौथीच्या गटात स्वरूप नावरकर तर सातवी गटात दीपक पाटील प्रथम


भुसावळ (26 मार्च 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात के.नारखेडे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी संस्थेतर्फे इयत्ता चौथी व इयत्ता सातवीसाठी घेण्यात आलेल्या केएनसिटीआय एमटीएस परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा बुधवार, 26 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजता पार पडला. अध्यक्षस्थानी के.नारखेडे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवगाव, ता.पारोळा येथील स्व.ग्रामरत्न वसंतरावजी जिभाऊ बहुउदेशीय संस्थेचे चेअरमन समीर वसंतराव पाटील, सेंट अलोयसीस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर मेरी सेलमा, संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, सहसेक्रेटरी विकास पाचपांडे, ऑननरी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे तसेच विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे उपस्थित होते. अतिथींनी आपल्या भाषणात संगणक शिक्षणाच्या गरजेचा पुनरुच्चार करत स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केल्याबद्दल संस्थेसाठी गौरवोद्गार काढले.तसेच अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी परीक्षेचा स्तर उंचावत राहण्याची ग्वाही दिली.

या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
चौथीच्या गटातून जिल्हास्तरावर प्रथम- स्वरूप प्रवीण नावरकर (एच.एच.पटेल प्राथमिक विद्यालय, चाळीसगाव), द्वितीय- पूर्वा राहुल भारंबे (तु.स. झोपे गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ), द्वितीय- अर्णव बाळकृष्ण कोठावदे (डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय, चाळीसगाव)


इयत्ता सातवीमध्ये जिल्ह्यातून प्रथम- दीपक उल्हास पाटील (एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ), द्वितीय- खुशी अजय शिंदे (श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आव्हाणा), द्वितीय- ओवी किरण शेळके (सेंट जोसेफ हायस्कूल, चाळीसगाव) आली.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
प्रास्ताविक परीक्षा समिती प्रमुख बी.ए.पाटील तर सूत्रसंचालन राहुल भारंबे यांनी केले. यादी वाचन चेतन ठोंबरे व एस.पी.झांबरे यांनी केले. गणेश जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले. यशस्वीतेसाठी केएनसीटीआय एमटीएस परीक्षा समिती प्रमुख बी.ए.पाटील, सी.बी.जोगी, मनोज कुलकर्णी, एस.पी.झांबरे, चेतन ठोंबरे, गणेश जगताप, श्री.श.चिपळोणकर, प्रमोद तळेले, सुनील भोळे, केएनसीटीआय एमटीएस लिपिक प्रशांत आर.सावकारे, दिनेश एस.गायकवाड, शुभम ए.ढाके, रवींद्र बादशहा व संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !