कोळन्हावी ग्रामस्थांनी अवैध लाकूड वाहतूक करणारे वाहन पकडले

Kolnhavi villagers catch vehicle transporting illegal timber यावल (27 मार्च 2025) : यावल तालुक्यातील कोळन्हावी या गावाजवळ अवैधरीत्या लाकूड वाहतूक करणारे वाहन कोळन्हावी येथील सरपंचांसह नागरिकांनी मंगळवारी पकडले. या मार्गावरून सातत्याने अवैधरित्या सातपुड्यातून वृक्षतोड करून लाकूड वाहतूक केली जाते, असा आरोपदेखील त्यांनी केला. हे वाहन मंगळवारी रात्री साडेआठ वाजता येथून लाकूडन भरून जात असताना वन विभागाला माहिती देण्यात आली.
कोळन्हावी, ता.यावल गावाजवळ वन विभागाचा तपासणी नाका आहे. या नाक्याजवळून वाहन क्रमांक (एम. एच. 04 डि.के. 8093) द्वारे अज्ञात चालक अवैधरित्या लाकूड वाहतूक करीत होता. याची माहिती कोळन्हावी सरपंच विकास सोळुंके यांना मिळाली. त्यांनी नाक्याजवळ वाहन थांबवले वनविभागाच्या नाक्याजवळ वाहन थांबतात चालकाने आणि त्याच्यासोबत असलेल्या वाहन मालकाने तिथून पळ काढला. वनविभागाचे कर्मचारी सलीम तडवी यांना ग्रामस्थांनी तेथे बोलावले आणि यावल वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता वाहन या ठिकाणी पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वन विभाग या संदर्भात कारवाई करत होते.

सतत अवैध लाकूड वाहतुकीचा आरोप
सातपुड्याच्या कुशीतून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या लाकूडतोड केली जाते. आणि सदरील लाकूड हे कोळन्हावी याच नाक्यावरून वनविभागाच्या नजरेखालून सातत्याने होत.े विविध वाहनातून ही वाहतूक केली जाते, असा आरोप सरपंच विकास सोळुंके यांनी केला आहे. वन विभागाकडून काटेकोरपणे येथे तपासणी व्हावी., अशी मागणी त्यांनी केली आहे.