बडनेरा-नाशिक विशेष मेमू आणि खंडवा ते सनावद विशेष गाडीच्या कालावधीमध्ये वाढ


Duration of Badnera-Nashik Special MEMU and Khandwa to Sanawad Special Train increased
भुसावळ (28 मार्च 2025) :
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विशेष ट्रेनच्या परिचालन कालावधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01211 बडनेरा ते नाशिक विशेष मेमू गाडीच्या वेळेत 1 एप्रिलपासून बदल करण्यात आला आहे.

या गाड्यांच्या कालावधीत वाढ
गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक विशेष मेमूसह गाडी क्रमांक 01212 नाशिक ते बडनेरा विशेष मेमू 30 एप्रिल 2025 पर्यंत तर गाडी क्रमांक 01091 खंडवा ते सनावद विशेष मेमूला व गाडी क्रमांक 01092 सनावद ते खंडवा विशेष मेमू 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. गाडी क्रमांक 01211 बडनेरा ते नाशिक विशेष मेमू 1 एप्रिल 2025 पासून बडनेरा येथून 10.05 वाजता सुटेल आणि नाशिक रोड येथील आगमन 7.05 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी मूर्तिजापूरला 10.30, बोरगाव 10.48, अकोला 11.02, शेगाव 11:33, नांदुरा 12.03, मलकापूर 12.38, बोदवड 1.37, भुसावळ 3.5, जळगाव 3:35, पाचोरा 4.5, चाळीसगााव 4.38, नांदगाव 5.20, मनमाड 5:50, लासलगाव 6.5, निफाड 6.25 तर नाशिक रोडलर 7.5 वाजता पोहोचेल.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !