भुसावळातील कवाडे नगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत
अध्यक्षपदी सुभाष लोखंडे तर उपाध्यक्षपदी विलास तायडे यांची निवड
भुसावळ (30 मार्च 2025) : शहरातील रेल्वे फिल्टर हाऊसजवळील कवाडे नगरातील बौद्ध विहारात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये वॉर्डातील जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी सुभाष पांडुरंग लोखंडे यांची तर उपाध्यक्षपदी विलास तायडे, सचिवपदी प्रदीप गायकवाड, उपसचि.पदी जगदेव तायडे, खजिनदारपदी विनोद त्रिमूर्ती, कार्याध्यक्षपदी सिद्धांत साळवे, दिलीप सोनवणे, किशोर बाविस्कर यांची निवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भुसावळ शहर समितीचे माजी अध्यक्ष गणेश सपकाळे, वाल्मीक देहाडे, बबलू नेतकर, अण्णा शिंदे, संगीत खरे, सोनु नेतकर, दीपक म्यांद्रे, निरंजना तायडे, मनोज बाविस्कर, पवन रोकडे, विजय बार्हे, तसेच महामाया प्रजापती महिला मंडळाच्या अध्यक्षा पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामानवाची जयंती उत्साहात साजरी करणार : सुभाष लोखंडे
सुभाष लोखंडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी विलास तायडे व समितीच्या पदाधिकार्यांची एकमताने निवड झाल्यानंतर कवाडे नगर वॉर्डातील बौद्ध उपासक उपासिकांनी सुभाष लोखंडे, विलास तायडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी सुभाष लोखंडे यांनी सांगितले की, वॉर्डातील बौद्ध बांधवांनी माझी ज्या विश्वासाने अध्यक्षपदी निवड केली आहे. तो सार्थ ठरवून वॉर्डात विविध सामाजिक उपक्रम राबवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल.
