चाळीसगावात चालला बुलडोझर : पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा अखेर उद्ध्वस्त

आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक


चाळीसगाव (30 मार्च 2025) : शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. या भागात असणार्‍या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी काही टवाळकर मुले येणार्‍या जाणार्‍या महिलांची छेड काढत असल्याच्यादेखील तक्रारी होत्या तसेच या खुल्या इमारती जुगाराचे व दारूचे अड्डे झाल्याने याचा मोठा त्रास परिसरातील रहिवाशांना होत होता.

याबाबत रविवारी सकाळी त्या भागातील महिलांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना होणारा त्रास कथन केला व आदित्य कॉलनीमधील टवाळखोरांचा तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली.


विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यासाठी यावे, असे कळविले व तात्काळ स्वतः महिलांसोबत त्या भागाला भेट दिली.

तिथे असणार्‍या टवाळखोरांच्या अडड्यांची पाहणी केली व त्या अनधिकृत जागा जेसीबीने उध्वस्त केल्या. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या या धडाकेबाज बुलडोझर कारवाईमुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हाकेला धावून येत तत्काळ बंदोबस्त केल्याबद्दल परिसराच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

तुमचा भाऊ हा नेहमी तुमच्या सोबत असून कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील. तसेच या भागातील नगरपालिकेच्या खुल्या जागांनादेखील तार कंपाउंड करण्याचे आश्वासन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !