भुसावळात मरीमातेच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या


भुसावळ (31 मार्च 2025) : जळगाव रोडवरील मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त रविवारी संध्याकाळी बारागाड्या ओढण्यात आल्या. मरीमातेचा जयघोष करीत बारागाड्या ओढण्यात आल्या. यात्रोत्सव असल्याने बारागाड्या पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली. यात्रोत्सवामुळे यावल, रावेरकडील बस सेवा बंद ठेवण्यात आली.

बारागाड्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
यात्रोत्सवानिमित्त मरीमातेच्या मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली. रोषणाई करण्यात आली आहे. जळगाव रोडवरील गुरूद्वारापासून बारागाड्या संध्याकाळी सहा वाजता ओढण्यात आल्या. त्या मरीमातेच्या मंदिरापर्यत ओढण्यात आल्या. भगत म्हणून मयुर भोळे तर बगले म्हणून राहूल पाटील, दुर्गेश पाटील होते. बारागाड्या पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठीच गर्दी झाली. यंदा बारागाड्यांवर बसणार्‍या युवकांना विशिष्ठ रंगाचे टी शर्ट देण्यात आले तर बारागाड्यांच्या चाकांजवळ असणार्‍यांना सुध्दा टीशर्ट देण्यात आले. एका गाडीवर केवळ आठ जणांनाच उभे राहण्याची परवानगी होती.


जड वाहनांसह बस वाहतूक बंद
यात्रोत्सवानिमित्त जळगाव रोडवरील वाहतूक दुपारी चार ते रात्री 11
वाजेपर्यत बंद ठेवण्यात आली. यावल, रावेरकडे जाणार्‍या बसेस बंद होत्या. जळगावकडे जाणारे ट्रक व अवजड वाहने सुध्दा तापी नदीच्या पलीकडे थांबवण्यात आली. रात्री 11 नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मार्ग बंद असल्याने यावल, रावेर मार्गावरील सुमारे 30 फेर्‍या बंद होत्या. यात्रोत्सवात शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !