भुसावळात नृत्याच्या जल्लोषात साजरी झाली ‘गुढीपाडवा पहाट’


भुसावळ (1 एप्रिल 2025) : शहरात सालाबादाप्रमाणे ‘नृत्य आराधना’ या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, 30 मार्च 2025 रोजी करण्यात आले. नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमी भुसावळ, गायत्री शक्तिपीठ, भुसावळ आणि संत गजानन महाराज फाउंडेशन, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला नृत्य शिक्षिका चारू भालेराव आणि सगळ्यात लहान कलावंतांच्या हस्ते चार वेदांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

भजनांनी वातावरण निर्मिती
प्रथम प्रणम्य शिरसा देव या गीतावर हेतल फेगडे, भक्ती उके, वीरा सोनवणे यांनी नृत्य सादर केले. नंतर शंकर भंडार बोले या गीतावर किमया भंडारी, देवकी नाईक, एकता वाणी यांनी नृत्य सादर केले. नंतर प्रणवी उपाध्याय आणि अश्वती सपकाळ यांनी जयजयवंती रागातील तराना प्रकार सादर केला. नुपूर भालेराव हिने राम भजन सादर करून वातावरण निर्मिती केली. नंतर गीता नारखेडे व गौरी पाटील यांनी गुढी पाडव्याच्या गीतावर नृत्य सादर केले. नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांनी रूपक तालातील राम भजन नृत्यातून सादर केले. नुपूर भालेराव, डिंपल गाढे, लतिका श्रीखंडे यांनी कथक नृत्य सादर केले नंतर मंजु शर्मा आणि प्रीती सोनवणे यांनी शिवस्तुतीवर नृत्य सादर केले. साक्षी कुलकर्णी आणि डिंपल गाढे यांनी शिव धृपद नृत्यातून सादर केले. वंदन हो या गीतावर स्वरा हेडा, अश्वती सपकाळ, प्रणवी उपाध्याय, आस्था पाटील यांनी नृत्य सादर केले. तर नुपूर भालेराव हिने कथक नृत्य करताना तोडे, तुकडे सोळा चक्कर भ्रमरी असे प्रकार सादर केले.


गीता नारखेडे, गौरी पाटील, हर्षदा साळी यांनी राम भजन नृत्यातून सादर केले. गायत्री शक्तिपीठ येथे सकाळी झालेल्या कार्यक्रमात रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी रमाकांत भालेराव, किरण फलक, भास्कर नारखेडे, राजेंद्र जावळे, हरीश कोल्हे गायत्री शक्तिपीठ परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !