अखिल भारतीय विश्वकर्मा महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अर्जून परदेशी यांची निवड

भोपाळ येथे 20 एप्रिल रोजी भटक्या विमुक्त जाती व जमाती विकास मंत्री सौ.कृष्णा गौर यांच्याहस्ते होणार सत्कार : राष्ट्रीय अध्यक्ष रामअवध विश्वकर्मा यांनी केली घोषणा


चाळीसगाव (3 एप्रिल 2025) : शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा लोहार समाजाचे सेवक अर्जून परदेशी (लोहार) यांची विश्वकर्मा लोहार समाजाचे महाराष्ट्रात संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी अखिल भारतीय विश्वकर्मा महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज एम आय डी सी गोविंदपुरा भोपाळ येथील विश्वकर्मा मंदिरात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली.

यावेळी सागर येथील माजी जिल्हा नियोजन अधिकारी तथा राष्ट्रीय सचिव जी पी विश्वकर्मा यांनी सूचना मांडली तर जबलपूर येथील रामबाबू विश्वकर्मा यांनी त्यास अनुमोदन दिले. बैतूल येथील विभागीय वन परिक्षेत्र अधिकारी तथा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ओमप्रकाश मालवीय यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मावळते अध्यक्ष दिनेश परदेशी (कुंढरीया) शेंदुर्णी, रिटायर्ड रेल्वे अधिकारी गोपाल विश्वकर्मा (टेहरके) पाचोरेकर,पत्रकार नारायण परदेशी ( एकनुरिया) चाळीसगाव, भोपाल जिल्हाध्यक्ष सुरेश विश्वकर्मा राष्ट्रीय संघटन मंत्री रामकुमार विश्वकर्मा, प्रदेश महामंत्री विपिन कुमार विश्वकर्मा, संयोजक सी आर बंधू विश्वकर्मा, सहसंयोजक ईश्वर देवी विश्वकर्मा, मध्य प्रदेशाध्यक्ष जसरथसिंह विश्वकर्मा, कोषाध्यक्ष रेवा शंकर विश्वकर्मा, मोतीराम जवणे बैतूल यांचेसह देशभरातून विवीध प्रांतिक अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थीत होते.

20 एप्रिलला भोपाळमध्ये सत्कार
अखिल भारतीय विश्वकर्मा महासभा ट्रस्टच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दि.30 मार्च रविवार रोजी भोपाळ येथे आयोजित करण्यात आली होती सुरुवातीला प्रास्ताविक राष्ट्रीय युवा अध्यक्ष दिवाकर विश्वकर्मा (बिना) यांनी मांडले. 20 एप्रिल रोजी विश्वकर्मा समाजाचे आदर्श सामूहिक विवाह सोहळा व युवक युवती परिचय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. याबाबत विचारविमर्श होवून जबाबदार्‍यांचे वाटप करण्यात आले. विद्यमान अध्यक्ष दिनेश परदेशी (शेंदुर्णी) यांनी नूतन अध्यक्ष पंढरीनाथ लक्ष्मण उर्फ अर्जून परदेशी यांच्याकडे कार्यभार सोपविला. दिनेश परदेशी यांना राष्ट्रीय संघटकपदाची नविन जबाबदारी देण्यात आली. आभार जिल्हाध्यक्ष सुरेश विश्वकर्मा यांनी मानले.

वेरूळ येथे विश्वकर्मा मंदिरात होणार राष्ट्रीय संमेलन
राष्ट्रीय अध्यक्ष तथा उद्योजक रामअवध विश्वकर्मा यांनी अर्जून परदेशी (एकनूरीया) यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ते म्हणाले की मध्यप्रदेश नंतर सर्वाधिक मोठे संघटन महाराष्ट्रात उभे राहणार असून लोखंड आणि लाकूड यांचेशी घनिष्ठ संबंध असलेला समाज एकत्र करण्याचे काम अर्जून परदेशी यांना करायचे असून त्यांना राज्य कार्यकारिणी, जिल्हा, तालुका तसेच शहराध्यक्ष निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावयाची असून त्यांना पदाधिकारी निवडीसाठी सर्व प्रकारची मुभा देण्यात आली आहे.त्यांनी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र (खान्देश), विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई उपनगरे व कोकण येथील संघटनमंत्र्यांची निवड करायची आहे.त्यांच्या नेतृत्वात वेरूळ येथे अखिल भारतीय विश्वकर्मा महासभेचे अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्याकरिता येत्या मे महिन्यात चाळीसगांव येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजीत करण्यात येईल असे ते म्हणाले.

शेवटच्या घटकाला संघटनेशी जोडणार
सत्काराला उत्तर देताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अर्जुन ( पंढरीनाथ ) परदेशी म्हणाले की मुंबई,पुणे, संभाजीनगर, नाशिक,जळगाव येथे लोहार समाज मोठया संख्येने आहे.माञ राज्यभरात तो विखुरलेला आहे. समाज एकत्रित करणे मोठे जिकरीचे काम असून त्यासाठी समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे लागणार आहे. गाव तेथे संघटना घर तेथे संघटनेचा कार्यकर्ता उभा करावा लागेल.सर्वाँना एकत्र करून समाजाला ताठ मानेने जगण्याचे बळ देण्याचे काम करू. यासाठी वेळोवेळी आपले मार्गदर्शन घेऊन पुढील वाटचाल सुरू राहील आपण दिलेल्या संधीचे सोने करू. दिलेल्या जबाबदारी बद्दल संघटनेचे त्यांनी आभार मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !