जळगाव एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोरटे जाळ्यात : दोन दुचाकी जप्त


Jalgaon MIDC police nab two-wheeler thieves: Two two-wheelers seized जळगाव (3 एप्रिल 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे दोन दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

गोपनीय माहितीद्वारे कारवाई
तक्रारदार यश मनोहरलाल अहुजा (24, रा.केमिस्ट भवन, जळगाव) यांनी 31 मार्च रोजी सिंधी कॉलनी सेवामंडळ परिसरातून त्यांची सीबीझेड मोटारसायकल (एम.एच. 19 बी.ए.1737) चोरीला गेल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती दुचाकी चोरताना दिसून आले.

या फुटेजच्या आधारे तपास करून आकाश संजय मराठे (रा. चौघुले प्लॉट, जळगाव) हा शनिपेठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासह माधव श्रावण बोराडे (रा. इंदौर) यांना शनीपेठ परिसरातून अटक करण्यात आली.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केल्यांनतर त्यांच्याकडून एकूण 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. तक्रारदार अहुजा यांची सीबी झेड मोटारसायकल आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलचा (एम.एच. 19 बी.टी. 6945) चा समावेश आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकूर आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.
WhatsApp Group