रेल्वे प्रवाशांना दिलासा : आठ साप्ताहिक विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
Relief for railway passengers: Duration of eight weekly special trains increased भुसावळ (4 एप्रिल 2025) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी पुढील गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे:
या गाड्यांच्या कालावधीत वाढ
बलसाड-दानापूर साप्ताहिक विशेष गाडीला 23 जून 2025 पर्यंत तर दानापूर-बलसाड साप्ताहिक विशेष गाडी 01 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली. उधना-पटना साप्ताहिक विशेष गाडीला 27 जून 2025 पर्यंत तर पटना-उधना साप्ताहिक विशेष गाडीला 28 जून 2025 मुदतवाढ मिळाली. राजकोट-मेहबूबनगर साप्ताहिक विशेष गाडीला 30 जून 2025 पर्यंत तर
मेहबूबनगर-राजकोट साप्ताहिक विशेष गाडीला 01 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. बांद्रा टर्मिनस-रिवा अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी 26 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली तर रिवा-बांद्रा टर्मिनस अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडी 27 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तिकीट बुकिंग सुविधा
अनारक्षित कोचसाठी तिकिटे युटीएस मोबाईल अॅप तसेच तिकिट खिडकीवरून उपलब्ध असतील. या गाड्यांसाठी अतिजलद मेल/एक्सप्रेस शुल्कासह अनारक्षित प्रवास करता येईल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.






