मानवी कल्याणासाठी भक्तीमार्ग सर्वांत महत्वाचा
भुसावळात भागवताचार्य इंद्रेश महाराज उपाध्याय
Bhagwatcharya Indresh Maharaj Upadhyay भुसावळ (4 एप्रिल 2025) : मानवी कल्याणासाठी भक्तीमार्ग सर्वांत महत्वाचा आहे. भक्तीसोबतच ज्ञान व वैराग्यदेखील आवश्यक आहे. भक्तीतूनही कल्याण होऊ शकते मात्र सामान्य भक्तीने कल्याण मुश्किल आहे. यामुळे भक्तीसोबतच ज्ञान व वैराग्यही आवश्यक आहे. कपट, इर्षा, द्वेष आपल्या मनात आहे. यामुळे भक्तीसोबत ज्ञान व वैराग्य पाहिजे. हेच श्रीमद् भागवत प्रदान करते. श्रीमद् भागवत कथा भक्तीसोबतच ज्ञान व वैराग्यातही निपूण करते, यामुळे श्रीमद् भागवत कथा मानवी कल्याणाचा प्रशस्त मार्ग आहे. असे मत वृंदांवन येथील भागवताचार्य इंद्रेश महाराज उपाध्याय यांनी केले.
भगवंतावर अतुट विश्वास हवा
शहरातील मातृभूमी चौकातील सुरभी मैदानावर झालेल्या भागवत सप्ताहात ते बोलत होते. ‘हम है श्याम के देवाने ग्रुप’ व समस्त भुसावळकरांकडून आयोजीत श्रीमद् भागवत कथा सप्हात बुधवारी कथेच्या दुसर्या दिवशी ते बोलत होते. यावेळी इंद्रेश महाराज उपाध्याय म्हणाले की, भगवंतावर विश्वास ठेवणे हे परमसत्य आहे. यामुळे भगवंतावर अतुट विश्वास असायला हवा. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील संतांच्या चरित्राचा अभ्यास मानवी जीवनाला भक्तीमार्गावर आणते. आपण विठोबाचा नामघोष करतो तर साक्षात पांडूरंग ज्ञानोबा तुकाराम नावाचे भजन करतात. एका विटेवर भक्तांच्या प्रतीक्षेत अनेक वर्षांपासून ते उभे आहेत, असे सांगून त्यांनी श्रीमद् भागवत कथेतील विविध कथांचे निरुपण केले.

माता-पित्याची सेवा भगवंताला प्रकट करते
पंढरपूर क्षेत्रात भक्ताकडून आई-वडीलांच्या सेवाभावातून भगवंत प्रकट झाले. भक्त पुंडलिकाने कोणत्याही प्रकारची भक्ती, वैराग्य, ज्ञान प्राप्ती केली नाही.केवळ आई-वडीलांच्या सेवेतून भगवंत प्राप्ती करता येते, याचे उत्तम उदाहरण आपल्या महाराष्ट्रात आहे. यामुळे बालकांनी आई-वडीलांची चरण वंदना करायला हवी, असेही इंद्रेश महाराज यांनी सांगितले.
भगवंतावर अ.सीम विश्वास हवा
परमेश्वराकडे कोणतेही मागणे नाही किंवा तक्रारही नाही. आपल्या जीवनात परमेश्वर जे करेल ते नक्कीच उत्तम करेल, ही भावना भक्ताच्या मनात असायला हवी. परमस्थितीची स्थिती भगवंताकडे असावी. ज्याप्रमाणे प्रवासात आपण रेल्वेचा चालक किंवा विमानाच्या पायलटवर विश्वास ठेवून प्रवास करतो, त्याच प्रमाणे भगवंतांवर विश्वास ठेवून जीवनाचा प्रवास करावा, असेही त्यांनी सांगितले.






