दंडकारण्य ही रामाची कर्मभूमी : भुसावळात स्वामी रमेशानंद


Dandakaranya is the Karma Bhoomi of Rama: Swami Rameshanand in Bhusawal भुसावळ (4 एप्रिल 2025) : श्रीरामांचा जन्म ज्या मुळ हेतूने झाला होता तो दुष्टांचे निर्दालन व साधूंचे रक्षण करणे हा होता. अशा वेळी दंडकारण्यातून श्रीरामाची कर्मभूमी सुरू झालेली आहे. अरण्याकांडात श्रीरामांनी झाडे, माडे, पशू, पक्षी आणि पर्यावरण या सर्वांशी मैत्री साधली त्यामुळे रामाच्या कार्यात या सर्वांनी पूर्ण मदत केल्याचे दिसून येते. अरण्यकांडातून प्रभूंनी पर्यावरण रक्षण हा मानव जातीला संदेश दिला असल्याचे विचार स्वामी रमेशानंद यांनी येथे व्यक्त केले.

भुसावळ शहरातील प्राचीन श्रीराम मंदिर, सराफ बाजार या ठिकाणी रामनवमीपर्यंत दररोज सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत संत एकनाथ रचित, भावार्थ रामायण यावर प्रवचन मालिकेचे आयोजन मंदिर समितीद्वारे करण्यात आले आहे. याप्रंसगी स्वामी रमेशानंद म्हणाले की, मानवधर्म रामायणातून स्वतः रामाने आचरला.




शूर्पनखाचे नाक, कान छेदले म्हणजे वासनरूपी दुर्गुणांचा नाश केला हा ही संदेश घेण्यासारखा आहे. आजच्या काळात रामकथेला समजून घेणे व त्याप्रमाणे आचरण केल्यास रामराज्य ही संकल्पना उदयास येऊ शकेल. नव्या दृष्टीतून रामकथेचा भावार्थ जाणून घेऊन तशी कृती केल्यास समाजाचे परम कल्याण नक्कीच होईल, असेही ते म्हणाले. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचा लाभ घेत आहेत. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !