धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : कुविख्यात घरफोड्या ‘पोपण्या’ला बेड्या

96 हजारांचा मुद्देमाल जप्त : आरोपीविरोधात दोन घरफोडीचे गुन्हे


धुळे (5 एप्रिल 2025) : अट्टल घरफोड्याला धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली असून त्याच्याकडून चाळीसगाव रोड हद्दीत केलेल्या घरफोडीतील 96 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण (19, अंबिका नगर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार फैजान उर्फ ईन्या मुजमील अन्सारी (25, हाजी नगर, इसार मशिदीजवळ, धुळे) हा पसार झाला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीत झालेली घरफोडी संशयीत रिहान पठाणने केल्याची धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर पठाणला ताब्यात घेतल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली देत त्यात साथीदार फैजान अन्सारीचाही सहभाग असल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून 16 हजारांचे फॅन्सी टॉप्स, 80 हजार रुपये किंमतीच्या दोन मंगलपोत व लोखंडी टॉमी जप्त करण्यात आली. आरोपी रिहान विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दोन तर फैजानविरोधात एक गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे




यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !