श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात अष्टमीनिमित्ताने होम हवन
Hom Havan on the occasion of Ashtami at Shri Kshetra Manu Devi Temple यावल (8 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळचं असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात नवरात्रोत्सव सुरू आहे. यात शनिवारी अष्टमी निमित्ताने होम हवन झाले. अष्टमीचा दिवस व शनिवार सुटीचा दिवस असल्याने येथे दर्शनाकरीता गर्दी झाली. श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरावर नवरात्रोत्सवानिमित्ताने अष्टमीच्या दिवशी होणार्या होम हवनाची सांगता झाली.
देवीला शालू परिधान
रोज प्रमाणे देवीला अभिषेक व स्नानकरून देवीला शालू परिधान करण्यात आला. त्यानंतर पूजेचे मानकरी आडगाव येथील डॉ.सुनील पांडुरंग सोळुंके व हिमानी सुनील सोळुंके होते. त्यांच्याहस्ते पूजा झाली तसेच होम हवनासाठी दाम्पत्यांची उपस्थिती होती. होम हवनानंतर पूजेसाठी त्यांना आमंत्रीत करण्यात आले. पूजा विधीही वेदशास्त्र संपन्न आचार्य श्री स्वानंद सुधाकर धर्माधिकारी गुरुजी, कुंदन सुधाकर धर्माधिकारी गुरुजी (किनगाव), ज्ञानेश्वर गुरुजी (जळगाव), परमेश्वर गुरुजी (जळगाव), सुधाकर गुरुजी (नायगाव) यांनी केला. या कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला मंदिर प्रशासनाचे सर्व पदाधिकारी यात संस्थानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील, शिवाजी प्रभाकर पाटील, नितीन भास्कर पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, सतीश भाऊराव पाटील, निळकंठ चौधरी, सुनील महाजन, मनुदेवी विद्यालयाचे लिपिक महेश पाटील तसेच सर्व ट्रस्टीची उपस्थिती होती.

