यावल शहरातील रथोत्सव मार्गावरील खड्ड्यांचे डांबरीकरणाला सुरूवात


Asphalting of potholes on Rathotsav road in Yaval city begins यावल (9 एप्रिल 2025) : शहरातील रथोत्सव मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे व त्यांना मुरूम मातीने न बुजवता थेट डांबरीकरण केले जावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उबाठा गटातर्फे यावल नगरपालिकेला देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत नगरपालिकेकडून सोमवारपासून रथ मार्गावरील खड्ड्यांचे डांबरीकरण करीत बुजवण्यास सुरूवात केली आहे. नगरपालिकेने काम सुरू केल्याने शिवसैनिकांसह नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. रथोत्सव शनिवारी साजरा केला जाणार आहे.

मागणीची दखल : मुख्याधिकार्‍यांकडून पाहणी
यावल नगरपालिकेत मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, शरद कोळी, पप्पू जोशी, योगेश चौधरी, हुसेन तडवी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी शहरातील श्री बालाजी रथोत्सव हा शनिवार, 12 एप्रिल रोजी होत आहे. संपूर्ण शहरातून रथ मार्गस्त होतो. रथ मार्गावर सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दरवर्षी माती मिश्रित बारीक कच टाकून, मुरूम टाकून या खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र हा कच काही वेळातच वाहनाच्या वर्दळीमुळे निघून जातो व खड्डे आहे तसेच राहतात. त्यामुळे रथास मार्गक्रमणात खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होतो. या मार्गावर डांबरीकरण करीत येत्या आठ दिवसांत खड्डे बुजवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी निशिकांत गवई, अभियंता सत्यम पाटील यांनी सोमवारी सकाळी या रस्त्यावरील खड्ड्यांचे डांबरीकरण करीत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. या कामाची पाहणी सेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केली. काम सुरू केल्याने शिवसैनिक व नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.





शनिवार, 12 रोजी रथोत्सव
शहरातील महाराणा प्रताप नगरातून हडकाई नदीच्या पुलावरून रथ शहरात दाखल होतो. तेथून मेन रोड, चावडी, बेहेडे सुपर शॉप ते नगर परिषद रस्ता, मेन रोड ते बोरावल गेट, देशमुख वाडा ते वाचनालय व श्री विठ्ठल मंदिर ते नगरपालिका कार्यालय पर्यंत रस्त्याचे काम होणार आहे. शनिवार, 12 एप्रिलला शहरात रथोत्सव साजरा केला जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !