सातबाराची स्थिती समजून घेण्यासाठी शेतकर्‍याची उपस्थिती गरजेची : तहसीसलदार मोहनमाला नाझीरकर


यावल (9 एप्रिल 2025) : प्रत्येक शेतकर्‍यांने आर्थिक वर्षाच्या सुरवातीला महसूल विभागाकडून घेतल्या जाणार्‍या चावडी वाचन कार्यक्रमात उपस्थित रहावे जेणेकरून शेतकर्‍यांना त्यांच्या सातबार्‍याची स्थिती समजते. फेरफार व मयत शेतकर्‍यांची माहिती होते, असे प्रतिपादन यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले. त्या बामणोद मंडळातील म्हैसवाडी गावात चावडी वाचनप्रसंगी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.

शेतकर्‍यांना मार्गदर्शन
महसूल विभागाकडून सध्या तलाठी कार्यालयात चावडी वाचन कार्यक्रम सुरू आहे. यात नुकतेच बामणोद महसूल मंडळात येणार्‍या म्हैसवाडी येथील तलाठी कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली चावडी वाचन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाधिकारी रशीद तडवी यांनी केले. याप्रसंगी नायब तहसीलदार अतुल गांर्गुडे यांची उपस्थिती होती. प्रसंगी शेतकर्‍यांना तहसीलदार नाझीरकर यांनी सखोल मार्गदर्शन करतांना शेतकर्‍यांनी चावडी वाचनाचे महत्व समजले पाहिजे, असे सांगत त्यांना मार्गदर्शन केले.


लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाची प्रचिती सर्वसामान्य जनतेला यावी व त्यातून सामान्यांचे सरकारी कार्यालयातील काम तत्परतेने व्हावे यासाठी शासनाने 100 दिवस कृती कार्यक्रम हाती घेतलेला आहे. याचाच एक भाग म्हणून महसूल विभागाकडून संपूर्ण राज्यात जिवंत सात बारा मोहीम राबविण्यात येत आहे. जिवंत सात बारा मोहीम संकल्पना 7/12 वरील मयत खातेदार यांचे नाव कमी करून त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे दाखल करणे. खातेदारांच्या याद्यांचे वाचन करून मयत खातेदार यांचा शोध घेणे. जर काही आक्षेपार्ह प्रकार घडला असल्यास तो देखील चावडी निर्दशनास येतो, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी गावातील विविध पदाधिकारी, ज्येष्ठ नागरीक शेतकरी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !