यावल शेतकी संघाच्या सभागृहात भाजपा स्थापना दिन उत्साहात


BJP Foundation Day in full swing at Yaval Shetki Sangh hall यावल (9 एप्रिल 2025) : यावल शेतकी संघाच्या सभागृहात रविवारी भाजपा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त सघांच्या सभागृहात ऑनलाइन बेबिनारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व संघटन मजबूत करण्याच्या सुचना केल्या.

विविध कार्यक्रमांनी स्थापना दिन उत्साहात
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्ष स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त यावलच्या सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील (ऑनलाईन) कार्यकर्ता संमेलनामध्ये संबोधन केले. या कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे उपस्थित राहुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी यावल तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, हर्षल पाटील, सविता भालेराव, बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, डॉ.कुंदन फेगडे, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, सह पक्षाचे माजी नगरसेवक, सरपंच, सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सदस्य, गट प्रमुख, सर्व गण प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख, सर्व बुथ प्रमुख, सर्व आघाडया, सर्व मोर्चा महिला आघाडी, सर्व शाखाध्यक्ष सक्रीय कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.


काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
यावल तालुक्यातील वढोदा गावाचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विक्की सोनवणे यांच्यासह गावातील मोठ्या संख्येतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार अमोल जावळे यांनी या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !