घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार !

राज्य शासनाचा निर्णय : लवकरच राबविणार कृत्रिम वाळू धोरण


Five brass sand bags will be available free of charge for households! जळगाव (9 एप्रिल 2025) : राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक वाळू गटात 10 टक्के वाळू घरकुलांसाठी राखीव असेल.

एम सँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करण्यात येऊन सरकारी बांधकामात ही वाळू वापरली जाईल. असे केल्यास नदीपात्रातील वाळूची गरज पडणार नसल्याने पर्यावरणाची हानी टळणार आहे. याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. एम सँड म्हणजे क्रुत्रिम वाळू ही दगड व गिट्टीपासून तयार केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात अशी वाळू तयार करण्यासाठी 50 एम सँड क्रशर निर्मिती केंद्र स्थापन केले जाईल.


वाळूबाबत सध्या अस्तित्वात असलेली जुने डेपो पद्धती बंद करण्याचा निर्णय झाला आहे. विशिष्ट ठिकाणची वाळू संपल्यानंतर डेपो बंद करण्यात येईल.

इथून पुढे नदी विभागाकरिता दोन वर्षांसाठी आणि खाडी पात्रासाठी तीन वर्षांकरिता लिलाव पद्धतीने वाळू उपसा दिला जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !