भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांना तेजो रत्न 2025 पुरस्कार जाहीर
Shishir Javale भुसावळ (11 एप्रिल 2025) : सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर दिनकर जावळे यांना तेजोदीप नव विचार फाउंडेशन नाशिक तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तेजवरत्न 2025 पुरस्कार जाहीर झाला आहे. तेजोदीप संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या ना तेजोरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
सामाजिक कार्याची दखल
शिशिर जावळे गेल्या 22 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
समाजातील प्रत्येक घटकांशी ते जोडले गेले असून सामाजिक प्रश्नांसाठी नेहमी पुढे असतात. गोरगरीब जनतेची सेवा, शेतकर्यांचे प्रश्न, विद्यार्थी समस्या, आरोग्य सेवा यात नेहमीच त्यांचा अग्रक्रम असतो. कुठलीही समस्या मांडताना न कचरता, आंदोलन असो किंवा मोर्चे असोत कुठल्याही बातम्या असोत, अन्यायाविरोधी लढा असो, प्रत्येक कामात सक्रिय कार्यकर्ता म्हणून पुढे असल्यानेच या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध पदांवर ते कार्यरत आहेत. शनिवार, 12 एप्रिल रोजी नाशिक येथे एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जावळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

