कुर्‍हेपानाचे गावावर आता तिसर्‍या डोळ्याची नजर

15 व्या वित्त आयोगातून गावात बसवले दहा अत्याधूनिक कॅमेरे


The third eye is now watching over Kurhepan’s village  भुसावळ (13 एप्रिल 2025) विकासाचा आदर्श समोर असला तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘नवदृष्टी’ साकार करता येते. कुर्‍हेपानाचे गाावात 15 व्या वित्त आयोगातून बसवलेले दहा सीसीटीव्ही कॅमेरे आज गावची दृष्टी बनले आहे. त्यांच्या सहाय्याने गावातला कानाकोपरा 24 तास नजरेखाली आला असून कोणतेही गैरकृत्य लपणार नाही व चांगले काम दिसल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त होत आहे. भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी गावातील सरपंच व पदाधिकार्‍यांना गावात सीसीटीव्ही बसवण्यासाठी पत्र देत पाठपुरावा केल्यानंतर त्यात यश आले व नुकतेच या कॅमेर्‍यांचे उद्घाटन करण्यात आले.

गावातील प्रत्येक हालचालीवर आता लक्ष
पंधराव्या वित्त आयोगाचा योग्य वापर करत गावात कुर्‍हेपानाचे ग्रामपंचायतीने गावात दहा अत्याधूनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेर्‍याच्या माध्यमातून गावातील प्रत्येक हालचालीवर आता लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे शिवाय अप्रिय घटनांना आळा बसणार आहे. गावाला लागूनच जामनेर महामार्ग गेला असून अपघात वा अप्रिय घटनेप्रसंगी गुन्हेगाराला शोधण्यासाठी आता सीसीटीव्हीची मोठी मदत होणार आहे.


यांची होती उपस्थिती
सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या उद्घाटनप्रसंगी भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, एएसआय संजय कंखरे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश बारी, कुर्‍हे ग्रामपंचायत सरपंच दुर्गाबाई सुरेश शिंदे, सदस्य जीवन पाटील, रामलाल बडगुजर, सावकार अशोक पारधी, जि.प.चे माजी सदस्य समाधान पवार, ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे, माजी सरपंच सुरेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !