भुसावळात मेजर रॉबर्ट गील यांना आदरांजली अर्पण

आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशनचा उपक्रम


Tributes paid to Major Robert Gill in Bhusawal भुसावळ (13 एप्रिल 2025)  जगप्रसिद्ध अजिंठा येथील लेण्यांमध्ये असलेल्या चित्रांच्या सर्वप्रथम प्रतिकृती साकारणारे प्रसिद्ध चित्रकार मेजर रॉबर्ट गील यांना भुसावळात त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच गुरुवार, 10 एप्रिल रोजी सामुदायिक आदरांजली अर्पण करण्यात आली. शहरातील आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन या कला प्रकारात कार्य करणार्‍या संस्थेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे.

रेल्वे इस्पितळासमोरील दफनभूमीत मेजर रॉबर्ट गील यांची समाधी आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात सेंट पॉल ख्रिश्चन सेमीट्रीचे अध्यक्ष रेव्हरंट किशोर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने सामुदायीक प्रार्थना आणि आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सप्तपुट ललितकला भवनाचे प्राचार्य अतुल मालखेडे यांची प्रमुख अतिथी उपस्थिती लाभली. सकाळी आठ वाजता झालेल्या कार्यक्रमात भारतातील प्रसिद्ध लेखिका तसेच रॉबर्ट गील यांचे अभ्यासक डॉ.प्रमिला शर्मा (सोलापूर) तसेच प्रसिद्ध लेखक प्रफुल्ल पळसुले देसाई यांची विशेष उपस्थिती होती. डॉ.प्रमिला वर्मा, प्रफुल्ल पळसुले देसाई यांना सन्मान पत्र, स्मृत चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


पुस्तक ठेवून वाहिली श्रद्धांजली
डॉ.प्रमिला वर्मा यांनी रॉबर्ट गील और ‘अजिंठा की पारो’ लिखीत पुस्तकाचे अनुभव सांगितले तसेच रॉबर्ट गील यांच्या समाधीवर रॉबर्ट गील और ‘अजिंठा की पारो’ पुस्तक ठेवून श्रद्धांजली वाहिली. आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशनचे संस्थापक राजेंद्र जावळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला.

यावेळी राजेंद्र जावळे, शाम कुमावी (नशिराबाद), पंकज नागपुरे (चोपडा), श्रीकांत पवार, विकास चौधरी, राशी प्रवीण पाटील, गिरीश लक्षवाणी (खिरोदा), प्रियांका कोळी (खिरोदा), अनिलराज पाटील (चोपडा), मनोहर झांबरे, (वराडसीम), रवीराज पाटील (चोपडा), पुष्कर पाटील (खिरोदा), दिगंबर खैरनार, प्रियांका कोळी या कलावंत व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमावेळी अजिंठा विषयावर चित्र साकारून आगळी-वेगळी आदरांजली अर्पण केली. यावेळी सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करीत मेजर रॉबर्ट गिल यांच्या कार्याचा गौरव केला. सर्व सन्माननीय चित्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन राजश्री देशमुख तर आभार राजेंद्र जावळे यांनी मानले. रमाकांत भालेराव व श्रीकांत पवार आदींनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !